बोईसर
बोईसर येथे १ रोजी शोकसभेचे आयोजन

बोईसर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा यांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी, दिनांक १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंत सृष्टी, बोईसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेत अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोड यांच्या कडून करण्यात आले आहे.


