शहर

धक्कादायक! विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या ‘शिक्षकाचा’ संतापजनक प्रकार उघड

डहाणू :- तालुक्यातील कोसबाड हिल येथून एक संतापजनक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारा हा प्रकार असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे सहाय्यक पैदासकर म्हणून कार्यरत असलेले डॉ. सिद्धार्थ कदम (वय ४८) यांनी कोसबाड हिल येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी तंत्र विद्यालयातील आदिवासी, गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

परीक्षेदरम्यान वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून आलेल्या कदम यांनी विद्यार्थिनींना नापास करण्याची भीती दाखवून मोबाईल नंबर घेतले.खासगी नंबरवरून कॉल आणि मॅसेज करून छळ केला “तू खूप सुंदर दिसतेस”, “तुझे केस सुंदर आहेत”, “तुझा ड्रेस छान आहे” अशा अश्लील व अयोग्य टिप्पण्या केल्या. परीक्षेदरम्यान मुलींजवळ उभे राहून घाणेरड्या नजरेने पाहत मानसिक त्रास दिला. त्याच्या परिणाम त्यांच्या परीक्षेवर झाला. पेपर व्यवस्थित लिहिता न आल्याने त्यांना लागणाऱ्या निकालाचे संकट उभे राहिले आहे.

प्राचार्यांवरही गंभीर आरोप

डॉ.कदम यांच्या बद्दल महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तक्रार केली असल्याचे प्राचार्य यांनी विद्यापीठाला विद्यापीठाला पत्र पाठविले असल्याची माहिती दिली आहे. मात्र घडलेल्या गंभीर घटनेची माहिती विद्यार्थिनींनी तात्काळ विद्यालयाच्या प्राचार्य कासले यांच्या कडे दिली. मात्र, “परीक्षा संपल्यावर बघू” असे सांगत प्राचार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कदम यांना अप्रत्यक्ष पाठीशी घातल्याचे बोलले जात आहे.

पालकांचा संताप

कदम यांचे परीक्षेदरम्यान वाईट वर्तन सुरूच राहिल्याने अखेर संतप्त पालकांनी विद्यालयात धडक देत लेखी तक्रार दाखल केली. मात्र, इतक्या गंभीर आरोपांनंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षणासाठी आलेल्या मुलींना जर अशा प्रकारचा मानसिक छळ सहन करावा लागत असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

अजूनही पदावर कार्यरत!

धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारीनंतरही डॉ. सिद्धार्थ कदम हे सध्या विरे येथील कृषी विद्यालयात वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.

जोरदार मागणी

अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर तात्काळ कडक कारवाई करून त्यांना सेवेतून हटवावे, अशी जोरदार मागणी पालक आणि स्थानिकांकडून होत आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

शिक्षण क्षेत्रातील या घाणेरड्या प्रकारावर प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button