बोईसर

शिवसेना नेते निलम संखे यांच्या दिनदर्शिका २०२६ चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य प्रकाशन”

बोईसर : – शिवसेनेच्या पालघर जिल्हा उपजिल्हा प्रमुख निलम संखे यांच्या पुढाकारातून छापून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२६ चे भव्य आणि उत्साहपूर्ण प्रकाशन शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडले. हा सोहळा म्हणजे शिवसेना बोईसरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक बळ, कार्यकर्त्यांची जिद्द आणि लोकाभिमुख राजकारणाचा ठळक प्रत्यय ठरला.

या दिमाखदार कार्यक्रमाला आमदार व संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते, तसेच असंख्य या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होते.

दिनदर्शिका २०२६ मध्ये शिवसेनेची ठाम वैचारिक भूमिका, संघर्षशील संघटनात्मक वाटचाल, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून केलेल्या लोकहिताच्या कार्यांचा प्रभावी आढावा मांडण्यात आला आहे. ही दिनदर्शिका म्हणजे केवळ तारखांचा संग्रह नसून शिवसेनेच्या लढवय्या परंपरेचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा जिवंत दस्तऐवज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलम संखे यांच्या कार्याची विशेष दखल घेत, “अशा उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, संघटना अधिक बळकट होते आणि लोकसेवेची दिशा ठाम होते. शिवसेना ही फक्त सत्तेची नव्हे, तर जनतेसाठी लढणारी चळवळ आहे,” असे ठाम शब्दांत सांगितले. तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्य देत संघटनात्मक काम अधिक गतीने पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

दिनदर्शिका २०२६ च्या प्रकाशनामुळे शिवसेना बोईसरच्या कार्यात नवी चैतन्यलाट निर्माण झाली असून आगामी काळात अधिक जोमाने लोकसेवेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button