छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ ला सुरुवात
७ मार्च ते १५ मे दरम्यान जिल्ह्यात ५३ ठिकाणी शिबिराचे आयोजन

पालघर दि,४ मार्च : महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पालघर जिल्ह्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा-क्र. १ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ४५ मंडळ स्तरांवर आणि ८ नगरपरिषद/नगरपंचायत स्तरांवर अशी एकूण ५३ ठिकाणी ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूलविषयक दैनंदिन अडचणींना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करून तक्रारींचे ऑन-द-स्पॉट निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.*शिबिरांमधील प्रमुख सेवा*प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निकाली काढणेअभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कलोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवाअकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शनकलम ४२ मधील सुधारणा अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणेकलम ४२अ, ४२व, ४२क, ४२ड अंतर्गत संपुष्टात आलेल्या सनद प्रणालीबाबत मार्गदर्शनएकवेळ अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्थाभूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणेEase of Doing Business अंतर्गत एक खिडकी व्यवस्था (Single Window Clearance), ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएम किसान, तक्रार निवारण व पाणंद रस्ते विषयक सुविधातुकडेबंद कायद्याविरुद्ध जमीन खरेदी-विक्री व हस्तांतरण व्यवहारांबाबत मार्गदर्शनअभियानाच्या प्रभावी नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका पार पडल्या. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून शिबिरांच्या आयोजनातील अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले . जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



