पालघर

सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करावी

पालघर : सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा, १९५९ व नियम, १९६० अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-१ (ER-1 Quarterly Return) मध्ये विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्च २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी हे विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघरमार्फत या माहितीचे संकलन सुरू असून, सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद अपेक्षित आहे. कायद्याच्या कलम ५(१) नुसार सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय आस्थापना, तसेच कलम ५(२) अंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी अचूक सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस सादर करणे आवश्यक आहे.ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. संबंधित आस्थापनांना यासाठी युजरनेम व पासवर्ड यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे लॉगिन करून माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच प्रत्येक आस्थापनाने आपला नोंदणी तपशील अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून कायद्याचे पालन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.या संदर्भात अधिक माहिती अथवा सहकार्याकरिता आस्थापनांनी palgharrojar@gmail.com या ई-मेलवर किंवा ९८२२८८०४७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button