शहर

“वारकरी साहित्य परिषदेचा १४ वा वर्धापन दिन भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न”

बोईसर :- येथील दत्तवाडी येथे वारकरी साहित्य परिषदेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. परिसर दत्तनाम आणि अभंगांच्या निनादाने दुमदुमला होता.

या भक्तिमय कार्यक्रमात हरिभक्त परायण विनोद महाराज, हरिभक्त परायण हेमंत महाराज, हरिभक्त परायण सुनील महाराज सोनवणे तसेच हरिभक्त परायण शितल ताई शिंदे यांनी उपस्थित भाविकांना अतिशय सुंदर, मनाला स्पर्श करणारे मार्गदर्शन केले.

त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि वाचनातून वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध नियोजन हरिभक्त परायण मोहन महाराज सिनलकर व हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज सुतार यांनी अत्यंत मनोभावे केले.

त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत व भक्तिमय वातावरणात पार पडला.श्रीदत्ताचे नामस्मरण, दिंडी, भजन, कीर्तन, अभंग आणि प्रेमभाव यातून उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक अनुभूती घेतली.

भक्तांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि पवित्र वातावरण निर्माण केल्याबद्दल आयोजकांनी सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button