शहर

बोईसर शहरात अनधिकृत फलकांचा सुळसुळाट; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

बोईसर : शहरातील मुख्य रस्ते, चौक, वळणे या सर्व ठिकाणी सध्या अनधिकृत जाहिरात फलकांनी अक्षरशः कब्जा केल्याचे चित्र दिसत आहे. दुकानदारांना जिथे जागा मिळते, तिथे फलक लावण्याची स्पर्धा सुरू झाली असून, यामुळे शहराचे सौंदर्य विद्रूप होत आहे. यातील काही फलक तर रस्त्याच्या तीव्र वळणांवर लावलेले असल्याने वाहनचालकांना दृश्य अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.

शहरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही बोईसर ग्रामपंचायतीकडून याकडे गंभीरतेने पाहिले जात नाही, असा आरोप समोर आला आहे. नियमबाह्य जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शहरातील वाढत्या विद्रुपीकरणावर प्रतिबंध आणण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्वरित कारवाई करून सर्व अनधिकृत फलक हटवावे, तसेच जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button