एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी

पालघर : आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे निवासी शिक्षण मिळावे, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू (जि. पालघर) अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता ६ वी ते ९ वी प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या अधिपत्याखाली पालघर जिल्ह्यातील कांबळगाव (ता. पालघर), चळणी (ता. डहाणू), सवणे (ता. तलासरी), शेंडेगाव (ता. शहापूर), पळसुंडे व हिरवे (ता. मोखाडा) येथील एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून एकूण ५८३ जागा रिक्त आहेत. असे डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी कळविले आहे.
रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे
कांबळगाव – ७०, चळणी – ८२, सवणे – ८०, शेंडेगाव – ७७, पळसुंडे – १२७, हिरवे – १४७.
डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका/महानगरपालिका व शासनमान्य शाळांमध्ये सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतील.
प्रवेशासाठी अटी
विद्यार्थी अनुसूचित जमाती / आदिम जमातीचा असावापालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावेजातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला आवश्यकसंबंधित इयत्तेची शैक्षणिक अट पूर्ण केलेली असावी.
आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्याचे आधारकार्ड, शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट, १ पासपोर्ट साईज फोटो
परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे
इयत्ता ६ वी : Mental Ability – ५० गुण, Arithmetic – २५ गुण, Language (English/Hindi/Regional) – २५ गुण, एकूण : १०० गुण.
इयत्ता ७ वी ते ९ वी :English – १० गुण Hindi/Regional – २० गुण, Mathematics – ६० गुण, Science – ६० गुण, Social Science – ४० गुण एकूण : २०० गुण.
अर्ज मिळण्याची व सादर करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२६
स्पर्धा परीक्षा : रविवार, १ मार्च २०२६ इ. ६ वी : सकाळी ११ ते दुपारी १ इ. ७ वी ते ९ वी : सकाळी ११ ते दुपारी २.
परीक्षा केंद्र पुढील प्रमाणे आहेत डहाणू व तलासरी तालुका : एकलव्य मॉडेल स्कूल, सवणे पालघर व वसई तालुका : एकलव्य मॉडेल स्कूल, कांबळगाव (बोईसर)
अर्ज निशुल्क असून भरलेला अर्ज संबंधित एकलव्य शाळेतच जमा करावा, असे आवाहन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी केले.
गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणासाठी ही एक सुवर्णसंधी असून पालक व मुख्याध्यापकांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असेही आवाहन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी केले .



