गुन्हे वार्ता

परपुरुषासोबत पत्नीला अर्धनग्न अवस्थेत पाहिल्यानंतर पतीकडून पत्नीची निर्घुण हत्या

पालघर :- तालुक्यातील परनाळी येथील आंबातपाडा परिसरात संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाने रागाच्या भरात स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मृत महिलेचे नाव आशा नितेश आंबात (वय २४ वर्षे) असे असून आरोपी पतीचे नाव नितेश सुरेश आंबात (वय २८ वर्षे) रा. आंबातपाडा, परनाळी, ता. जि. पालघर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश याने त्याची पत्नी आशा हिला मंगळवारी रात्री १२:३० वाजता दिनेश ऊर्फ टिल्लू दांडेकर या व्यक्तीसोबत घराच्या अंगणात अर्धनग्न अवस्थेत पाहिल्याने आरोपी पतीचा राग अनावर झाला.

संतापाच्या भरात त्याने प्रथम पत्नीला चापट मारून खाली पाडले आणि त्यानंतर अंगणात पडलेल्या पॅकिंगच्या प्लास्टिक दोरीने तिचा गळा आवळून निर्दयीपणे खून केला.

घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी तारापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कणसे आणि इतर कर्मचारी तत्काळ दाखल होत घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना साठी तारापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

हत्या करून लपून बसलेल्या आरोपी पतीला मंगळवारी रात्री साडे सात वाजता ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

पत्नीची हत्या केल्या प्रकरणी आरोपी पती नितेश सुरेश अंबात याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे तारापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ला पालघर येथील मा.न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button