गुन्हे वार्ता

मद्यपी वाहनचालकांवर पालघर पोलिसांचा करडा प्रहार ! 31 डिसेंबर रोजी मद्यपी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

पालघर :- रस्ते सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या मद्यपी वाहनचालक व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात पालघर पोलिसांनी सातत्याने आणि कठोर कारवाई करत कायद्याची भीती निर्माण केली आहे. नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरू ठेवला आहे.

३१ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १५४ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अवैध प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली.

पालघर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नववर्षाच्या रात्री रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

२०२५ या संपूर्ण वर्षाचा आढावा घेतला असता,

• मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ७२७ वाहनचालकांवर कारवाई,

• अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५१३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई,

• तर वर्षभरात तब्बल २.३० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

२०२३ मध्ये, दारू पिऊन वाहन चालविणे तसेच अवैध वाहतुकीच्या प्रकरणांतून १.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

२०२४ मध्ये, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ४४९ वाहनचालकांवर गुन्हे दाखल,

१६६ वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक सुरक्षितता, अपघात टाळणे आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी पालघर पोलीस कोणतीही तडजोड करणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button