Uncategorized

पालघर पोलिसांची गांजा व अंमली पदार्थ साठवणूक करणाऱ्या माफियांवर कारवाई,

पालघर :- अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून, पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या कडक व स्पष्ट आदेशांनुसार जिल्हाभरात ड्रग्सविरोधी मोहिम आक्रमकपणे राबविण्यात येत आहे. याच धोरणांतर्गत तलासरी पोलिसांनी गांजा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.

दि. ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे संभा (इराणी फार्म वाडी) येथे गांजाची साठवणूक करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तात्काळ छापा टाकला.

छाप्यादरम्यान घरातून २.९६५ किलो वजनाचा फिकट तपकिरी रंगाचा, उग्र वास असलेला गांजा सदृश्य कोरडा पदार्थ (पाने, फुले, काड्या व बिया) जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या गंभीर प्रकरणी तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क) व २०(ब) प्रमाणे दि. ०४/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी : १ मोहम्मद चंगेज हाजी अब्दुल रौफ शेख ऊर्फ मोईन्नुदीन रौफ शेख (वय ३६),रा. फॉरेस्ट ऑफिसजवळ, संजाण, ता. उंबरगांव, जि. बलसाड २.अतिश गणेश कुमरे (वय २८),रा. स्वप्नलोक माणिक अपार्टमेंट, उंबरगांव, जि. बलसाड

दोन्ही आरोपींना दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. अमोल चिंधे (तलासरी पोलीस ठाणे) करत आहेत.

ही संपूर्ण धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोउपनिरी विकास दरगुडे, अमोल चिंधे, श्रेणी पोउपनिरी जयराम उमतोल, सपोउपनिरी हिरामण खोटरे, तसेच तलासरी पोलीस ठाण्याचे अधिकारी-अंमलदार व फॉरेन्सिक पथक सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button