शैक्षणिक

१२ वी विज्ञान (ST) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! व्यावसायिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य – ऑनलाईन अर्जाचे आवाहन

पालघर :- जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पालघर कार्यालयाच्या वतीने यासंदर्भात आवाहन करण्यात आले असून, संबंधित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://etribevalidity.trti-maha.in/

ही संपूर्ण प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार असून, वेळेत अर्ज न केल्यास भविष्यात प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही समितीने सूचित केले आहे.

त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ST प्रवर्गातील १२ वी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी ही माहिती गांभीर्याने घेऊन तत्काळ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button