पालघर

पालघर जिल्ह्यात लघुसिंचन व जलसाठा प्रगणनेसाठी बाह्य संस्थानी प्रस्ताव सादर करावे

पालघर, दि. 1 डिसेंबर : केंद्र सरकारतर्फे देशभरात राबवल्या जाणाऱ्या लघुसिंचन योजनांची 7 वी प्रगणना, जलसाठ्यांची 2 री प्रगणना, तसेच मोठ्या व मध्यम प्रकल्पांची व झऱ्याची 1 ली प्रगणना सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व संबंधित योजनांची तपशीलवार नोंदणी करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत असून जिल्हास्तरावरील कामासाठी पात्र बाह्य संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

या प्रगणनेत खालील पूर्ण झालेल्या योजनांचा समावेश आहे • भूपृष्ठाखालील जलसाठा वापर योजना : साध्या विहिरी, उथळ/मध्यम/खोल कुपनलिका.

• भूपृष्ठावरील जलसाठा वापर योजना : ०-२००० हेक्टर लघु सिंचन योजना, धरणे, कालवे, बंधारे, उपसा सिंचन योजना इत्यादी.

• नागरी व ग्रामीण भागातील जलसाठे, 2000 हेक्टरपेक्षा जास्त सिंचनक्षमता असलेले मोठे प्रकल्प.

• कृषी, मृदसंधारण विभागांतर्गत सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहिरी.

• भूजल सर्वेक्षणाशी संबंधित कूपनलिका.

राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या 26 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास पूर्वी प्रगणना केलेल्या अनुभवी संस्थांची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालघर जिल्ह्यासाठी संस्था निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव व आवश्यक प्रमाणपत्रांसह दि. 3 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा–ठाणे यांच्या कार्यालयात सादर करावेत. इतर जिल्ह्यांमध्ये नियुक्ती आदेश प्राप्त किंवा पूर्वानुभव असलेल्या संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी संजय कचरे (मो. 9167872789) यांच्याशी संपर्क साधावे तसेच संबंधित तपशील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button