पालघर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; मुकुंद व्ही. शर्मा यांनी दाखवली केराची टोपली

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर : – मौजे बोईसर पश्चिम येथील सर्वे नंबर 31/1 आणि 31/2 या परमाणु नगर परिसरातील भूखंड क्रमांक 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 — एकूण 5271 चौरस मीटर क्षेत्रफळ — न्यूक्लिअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीचा असून, अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेश क्रमांक एनएपी/एसआर/39/97, दिनांक 25 फेब्रुवारी 1997 नुसार ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी बिनशेती करण्यात आली होती.त्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, या ठिकाणी तळमजला अधिक एक मजल्यापेक्षा जास्त बांधकाम करता येणार नाही. मात्र, प्लॉट नंबर 6ए चे मालक मुकुंद व्ही. शर्मा यांनी या अटीचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम सुरू केल्याचा आरोप आहे.या संदर्भात पालघर दिवाणी न्यायालयात वादाचा दावा प्रलंबित असून, न्यायालयाने 25 जून 2024 रोजी स्पष्ट आदेश दिला होता की, “दुसऱ्या मजल्यावरील बांधकामात कोणतेही बदल करू नयेत” असा जैसे थे आदेश देण्यात आला होता.मात्र, न्यायालयाचा आदेश असतानाही शर्मा यांनी बंगल्याचे बांधकाम सुरू ठेवत न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट (न्यायालयाचा अवमान) अंतर्गत गुन्हा दाखल करून बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.या प्रकरणात पुढे पालघर दिवाणी न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
