खवडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे देशातील पहिली तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू ; –पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

नदीम शेख पालघर :- लोकसहभागावर आधारित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते खवडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे देशातील पहिली पायाभूत प्रकल्पांसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आली.
उद्घाटन संसद खेळ महोत्सव २०२५च्या पार्श्वभूमीवर आर्यन हायस्कूल मैदानावर झाले.ही हेल्पलाईन शेतकरी व ग्रामस्थांना थेट कंपनीशी संवाद साधण्याची सुविधा देईल. सोमवार ते शनिवार सकाळी ९:३० ते सायं. ५:३० या वेळेत कार्यरत राहणाऱ्या या हेल्पलाईनवर प्रशिक्षित मराठी भाषिक ऑपरेटर तक्रारींची नोंद घेतील आणि ४८ तासांत प्रतिसाद देतील.
रेसोनियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष निनाद पितळे यांनी सांगितले की, “हा उद्योग क्षेत्रातील पारदर्शकता आणि जबाबदारीचा नवा मापदंड आहे. प्रत्येक कॉलची नोंद व तपासणी केली जाईल.”खवडा–पडघा दरम्यानचा हा उच्चदाब वीजप्रवाह मार्ग गुजरातमधील नूतन ऊर्जा उद्यानातून ७ गिगावॅट हरित ऊर्जा महाराष्ट्रात पोहोचवेल. या उपक्रमामुळे राज्यातील वीजटंचाई कमी होऊन हरित ऊर्जेला गती मिळणार आहे.

